You are currently viewing दीपावली संस्कृती

दीपावली संस्कृती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”दीपावली संस्कृती”*

 

अवघाची संसार होवो सुखी नांदू दे आनंदानं

दिपावली संस्कृती दीव्यानं तिमीर जाई निघुनIIधृII

 

सूर्य चंद्र झाले आपले सारथी त्यांच्या मर्जीनं

ग्रह तार्‍यांच्या रांगोळ्या करती दिशा मार्गदर्शन

कालचक्र ऋतुचक्र आयुष्य गोफ विणती प्रेमानं II1II

 

अश्वयुजी पाक यज्ञ आग्रयण पाक यज्ञ पार्वण

पाक यज्ञांतून जपली जाते पूर्वजांची आठवण

दिवाळी आहे तिन्ही यज्ञांचे शृंखला मिश्रणII2II

 

अश्विन वद्य द्वादशीला गाय वासरूचे पूजन

दत्तगुरु श्रीकृष्ण राखती पशुधनांचे सन्मान

सृष्टीला वंदन पर्यावरण धर्माची शिकवणII3II

 

धन्वंतरीचा अवतार समुद्रमंथनांतून

आरोग्य सौष्ठव स्वास्थ्य समृद्धी करी प्रदान

पूजावे धन्वंतरी धन वही दीप वाटे प्रसन्नII4II

 

आदितीची कुंडले इंद्र देवांना छळीले असुरानं

सत्यभामा श्रीकृष्णाने केला नरकासूर वध

बंदिस्त सोळा सहस्र युवतींना दिले नवजीवनII5II

 

अलक्ष्मीला द्यावे टाळून लक्ष्मीचे करावे स्वागत

लक्ष्मीला पाऊले काढून घ्यावे घरांत ओवाळून

कुबेरा सह लक्ष्मी येते घरांत होते स्थानापन्नII6II

 

वर्षारंभ कार्तिक शुद्ध प्रतिपदा विक्रम संवत

पाडवा बदलत्या काळाचे बदलते रूप देखणं

साडे तीन मुहूर्तापैकी आनंदी सणं मिळे मिष्टांन्नII7II

 

कार्तिक द्वितीया यमराजाची गोष्ट सर्वज्ञात

भाऊबीज बहिण भावाला ओवाळी आदरानं

दीपावली मोठा सण हिंदू संस्कृतीचे आंदणII8II

 

श्री अरुण गंगल कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा