You are currently viewing पणदूर ओव्हरब्रिजवर भीषण अपघात

पणदूर ओव्हरब्रिजवर भीषण अपघात

पणदूर ओव्हरब्रिजवर भीषण अपघात; कारमधील ५ प्रवासी जखमी

कुडाळ

मुंबई-गोवा महामार्गावरील पणदूर ओव्हरब्रिजजवळ आज सकाळी ९ वाजता एका भरधाव कारचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कारमधील पाच प्रवासी जखमी झाले असून, कारचे मोठे नुकसान झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सदर कार कणकवलीच्या दिशेने जात असताना चालकाचा वेगावर नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचा अंदाज आहे. अपघात इतका जबरदस्त होता की कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आणि महामार्ग पोलिसांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणाचा पुढील तपास कुडाळ पोलीस करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा