यमुनानगर निगडी –
यमुनानगर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम नाना नानी विरंगुळा केंद्रात अत्यंत उत्साहात संपन्न झाला. अध्यक्ष श्री गजानन ढमाले यांनी प्रास्ताविक केले. श्री दत्तात्रय गुंजाळ यांनी आपल्या ओघवत्या भाषेत ज्ञानेश्वर माऊलींचे शब्दचित्र डोळ्या समोर हुबेहूब उभे केले. सौ विनिता श्रीखंडे यांनी एक हलकीफुलकी ज्येष्ठांची मनोगत व्यक्त करणारी व्हाट्सअप जादूची कांडी, ही कविता सादर केली. आनंदी कसे जगायचे याचे आता कळले आहे तंत्र, व्हाट्सअप या जादूकांडीने दिलाय सुखी जीवनाचा मंत्र.
ऑक्टोबर महिन्यातील ज्येष्ठांचा वाढदिवस भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. श्री रमाकांत श्रीखंडे यांनी माजी राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन यांच्या आठवणी सांगितल्या. सभासदांमधून लकी ड्रॉ काढण्यात आला. आजचे भाग्यवंत श्री प्रदीप पाटील यांना गणेशाची मूर्ती भेट दिली. संघातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वांनीं अल्पोहार व दुग्धपानाचा आस्वाद घेतला, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. विनीता श्रीखंडे यांनी केले. हया कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन श्री दत्तात्रय गुंजाळ, अशोक नहार, श्री प्रदीप मुजुमदार, श्री बाळासाहेब चव्हाण, श्री भाऊसाहेब म्हेत्रे, श्री गोविंद खवास्कान यांनी केले. श्रीमती मंगला पाटसकर यांनी आभार प्रदर्शन केले. पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली.

