*वेंगुर्लेत भाजपाची आत्मनिर्भर अभियान कार्यशाळा संपन्न*
वेंगुर्ले
दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता वेंगुर्ला भाजप कार्यालय येथे आत्मनिर्भर अभियान मंडल कार्यशाळा संपन्न झाली. सदर बैठक जिल्हा बँक अध्यक्ष मान. मनीषजी दळवी साहेब, तालुकाध्यक्ष विष्णू परब, प्रदेश निमंत्रीत शरदजी चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, माजी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जिल्हा उपाध्यक्ष सुषमा प्रभुखानोलकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य साईप्रसाद नाईक, मनवेल फर्नांडीस, प्रीतेश राउळ, संतोष गावडे, तालुका सरचिटणीस वसंत तांडेल, राजबा सावंत, महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पडवळ, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हेमंत गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष सुषमा प्रभुखानोलकर यांनी आत्मनिर्भर अभियानाची संकल्पना आपल्या विशेष शब्दात मांडली. बैठकीस उपस्थित असलेल्या सर्व पदधिकारी यांना स्वदेशी वस्तू विकत घेण्यासाठी आव्हान करण्यात आले. याचवेळी आत्मनिर्भर संकल्प पत्रके उपस्थित असलेल्या पदाधीकार्याकडून भरून घेण्यात आली. सदर बैठकीस सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी, सर्व महिला, युवा मोर्चा पदाधिकारी, सर्व मोर्चा सेल, आघाडी चे पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख , बुथ अध्यक्ष, सरपंच , उपसरपंच,नगरसेवक, सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.

