मालवण पोलीस ठाणे येथे सायबर गुन्हे अनुषंगाने जनजागृती मार्गदर्शन
मालवण
सायबर तक्रारी तसेच सायबर गुन्हे अनुषंगाने जनजागृती मार्गदर्शन मालवण पोलीस ठाणे येथे आयोजित करण्यात आले होते. महिला पोलीस धनश्री परब, स्नेहल जावकर यांच्या माध्यमातून पोलीस पाटील यांना मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती नयोमी साटम यांच्या संकल्पनेतून सायबर जनजागृती, जनसंवाद मोहीम अंतर्गत मालवण पोलीस ठाणे येथे सायबर पोलीस सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून सायबर तक्रारी तसेच सायबर गुन्हे अनुषंगाने हे जनजागृती मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. सायबर गुन्हे रोखण्यासाठी व फसवणूक टाळण्यासाठी सर्वांनी सजग आणि सतर्क असले पाहिजे. याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक मारुती जगताप, मार्गदर्शक महिला पोलीस धनश्री परब, स्नेहल जावकर, पोलीस कर्मचारी सुशांत पवार आदी उपस्थित होते.
मालवण पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस पाटील यांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच याबाबत गावागावात जनजागृती करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

