You are currently viewing दिवा

दिवा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*दिवा*

—————–

 

गेलेला माणूस

परतायला हवा

उंबरठ्यावर

लावला दिवा

 

धनलक्ष्मी ला

दावायला वाट

अंगणी पणत्यांचा

घातला घाट

 

रंगीत कंदील

उंच आकाशात

गगन सारे

प्रकाशात

 

दगडी दीपमाळ

देवळा समोर

पाहुन मनात

नाचतो मोर

 

दिवाणखान्यात

अत्तर दिवे

समई, निरंजन

देवघरात हवे

 

सर्वात मोठा

ज्ञानाचा दिवा

काना कोपऱ्यात

लावायला हवा

 

श्रीनिवास गडकरी

रोहा पेण पुणे

केवळ नावासहितच पुढे पाठवावे

@ सर्व हक्क सुरक्षित

प्रतिक्रिया व्यक्त करा