You are currently viewing कवी गझलकार विजय जोशी (विजो) यांना लो.टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण पुरस्कृत द्वारकानाथ शेंडे स्मृती प्रित्यर्थ मानाचा “मोक्षदा” पुरस्कार प्रदान

कवी गझलकार विजय जोशी (विजो) यांना लो.टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण पुरस्कृत द्वारकानाथ शेंडे स्मृती प्रित्यर्थ मानाचा “मोक्षदा” पुरस्कार प्रदान

*”वृत्तबद्ध कविता ते गझल (तंत्र आणि मंत्र)” या पुस्तकाला जाहीर झाला होता पुरस्कार*

रत्नागिरी :

लो.टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण पुरस्कृत कविवर्य द्वारकानाथ शेंडे स्मृती प्रित्यर्थ ‘मोक्षदा’ हा मानाचा समीक्षा पुरस्कार कवी, गझलकार, गीतकार, समीक्षक विजो (विजय जोशी), डोंबिवली यांच्या ‘वृत्तबद्ध कविता ते गझल (तंत्र आणि मंत्र)’ या पुस्तकाला जाहीर झाला होता. रविवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी हा पुरस्कार चिपळूण इथे संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मा.गझलकार साहित्यिक श्री.कैलाश गांधी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष श्री.अरुण इंगवले, संचालक मनिषा दामले, अनिल धोंड्ये, प्रकाश देशपांडे, सर्व कार्यकारिणी सदस्य, चिपळूण शहरातील साहित्यिक आणि साहित्य प्रेमी उपस्थित होते.

सन्मान पत्र, ₹५०००/- रोख आणि टिळक उपरणे असे या पुरस्काराचे स्वरूप होते. वृत्तबद्ध कविता आणि गझल शिकण्यासाठी विजो यांचे हे पुस्तक म्हणजे जणू मार्गदर्शनाचा दीपस्तंभ असल्याप्रमाणे आहे. त्यामुळेच कवी विजो यांचे आणि ‘वृत्तबद्ध कविता ते गझल तंत्र आणि मंत्र ‘ या पुस्तकाचे साहित्य क्षेत्रात सर्वत्र कौतुक होत असून पुस्तकाला साहित्यावर प्रेम करणाऱ्या, साहित्याची जपणूक करणाऱ्या संस्थांकडून सदर पुस्तकाला विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा