You are currently viewing सावंतवाडी पंचायत समिती आरक्षण सोडत पार

सावंतवाडी पंचायत समिती आरक्षण सोडत पार

विविध प्रवर्गांमध्ये आरक्षण निश्चित; प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या उपस्थितीत सोडत शांत व शिस्तबद्धरीत्या पार पडली

सावंतवाडी :

सावंतवाडी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत आज प्रांताधिकारी कार्यालयात पार पडली. या सोडतीत विविध प्रवर्गांनुसार आरक्षण निश्चित करण्यात आले.

यावेळी कलंबिस्त, आंबोली, मळगाव, माजगाव, न्हावेली, इन्सुली, सातार्डा ही गावे सर्वसाधारण खुल्या प्रवर्गात, तर माडखोल, कारिवडे, चराठे, मळेवाड, बांदा, तांबोळी या गावे सर्वसाधारण महिला प्रवर्गात आरक्षित ठरली.

त्याचप्रमाणे कोलगाव, आरोंदा ही गावे ना. मा. प्र (महिला), विलवडे, शेर्ले ही गावे ना. मा. प्र, आणि तळवडे हे गाव अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गात आरक्षित करण्यात आले.

या सोडतीच्या वेळी प्रांताधिकारी हेमंत निकम व तहसीलदार श्रीधर पाटील उपस्थित होते. तनुषी जाधव व भक्ती मुळीक यांनी आरक्षणासाठी चिठ्ठ्या काढल्या.

शांत, शिस्तबद्ध पारदर्शक पद्धतीने आरक्षण सोडत पार पडली. आगामी पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा