मालवण :
मालवण शहरातील धुरीवाडा येथील शिवसेनेचे सक्रीय कार्यकर्ते वसंत देवेेंद्र गावकर यांची शिवसेनेच्या मालवण शहर मच्छीमार सेल अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी ही निवड जाहीर केली. आमदार निलेश राणे यांच्या हस्ते वसंत गावकर यांना नियुक्तिपत्र सुपूर्द करण्यात आले.
वसंत गावकर यांना दिलेल्या नियुक्तिपत्रात म्हटले आहे की, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने व शिवसेनापक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिवसेना कार्यकारिणीच्या मालवण शहर मच्छीमार सेल अध्यक्षपदी श्री वसंत देवेेंद्र गावकर यांची नियुक्ती करण्यात येत आहे.
सदर नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असेल. हिंदुत्वाचा विचार आणि शिवसेनेचा प्रसार वाढवण्यासाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख राजा गावडे, जिल्हा संपर्कप्रमुख महेश कांदळगावकर, शहरप्रमुख दीपक पाटकर, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, शहर संघटक राजू बिडये, भाऊ मोरजे, वायरी विभागप्रमुख मंदार लुडबे, बाबू धुरी, महेश सारंग, आबा शिर्सेकर, शिवाजी केळूसकर, संदीप धुरी, दत्ता केळूसकर, नागेश वेंगुर्लेकर, गणेश परब, एकनाथ मोहिते, सिद्धेश पाटाडे, किरण जोगी, गौरव सावबा, गजानन पराडकर, गितेश पराडकर, विश्वजित मंचेकर, शुभम सावंत, प्रथम सारंग, अनिकेत खडपकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
