You are currently viewing कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ‘काव्यशिल्प’ व कालिदास प्रतिष्ठानतर्फे कवी संमेलनाचे आयोजन

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ‘काव्यशिल्प’ व कालिदास प्रतिष्ठानतर्फे कवी संमेलनाचे आयोजन

*चांदण्यांच्या साक्षीने झंकारतील कवितेचे सूर*

*सांस्कृतिक सौंदर्य आणि साहित्यिक सृजनाचा अनोखा मिलाफ*

 

पुणे :

काव्यशिल्प आणि महाकवी कालिदास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवार, दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ४ ते ७ या वेळेत भारत स्काऊट ग्राउंडच्या प्रशिक्षण सभागृहामध्ये पार पडणार आहे.

 

काव्यशिल्पच्या प्रथेप्रमाणे याही वर्षी कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने हा सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात येणार असून या महिन्याची तिसऱ्या शनिवारची नियमित मासिक सभा होणार नाही, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.

 

कार्यक्रमात दोन्ही संस्थांच्या निमंत्रित कवी व कवयित्रींना काव्य सादरीकरणाची संधी दिली जाईल. तसेच वेळ उपलब्ध असल्यास उपस्थित इतर कवींनाही काव्यवाचनाची संधी मिळणार आहे.

 

कार्यक्रमानंतर अल्पोपहार आणि दुग्धपानाचा आनंद घेता येणार असून सर्व रसिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन काव्यशिल्पचे अध्यक्ष श्री. वि. ग. सातपुते, उपाध्यक्ष महेंद्र ठाकुरदास आणि सौ. संध्या गोळे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा