अध्यक्ष इर्शाद शेख यांच्या अनुपस्थितीत विलास गावडे यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा तात्पुरता प्रभार
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. इर्शाद शेख यांना आरोग्याच्या कारणास्तव औषधोपचारासाठी बाहेर गावी जावे लागत असल्याने, त्यांच्या अनुपस्थितीत जिल्हाध्यक्षपदाचा तात्पुरता प्रभार वरिष्ठ उपाध्यक्ष मा. श्री. विलास गावडे यांच्याकडे देण्यात आला आहे.
ही नियुक्ती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेवरून पुढील आदेश येईपर्यंत लागू राहील. या निर्णयाची अधिकृत माहिती श्री. इर्शाद शेख यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आली असून, वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी यास दुजोरा दिला आहे.
या नियुक्तीमुळे जिल्हा काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, अशी पक्षात अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

