सावंतवाडी / मळगाव:
माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. या वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून मळगाव ता. सावंतवाडी येथील कै.उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरच्या वतीने वाचनालयाच्या रमाकांत सूर्याजी खानोलकर सभागृहात बुधवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता उत्कृष्ट वाचक सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्री.अमोलजी चव्हाण, पोलिस निरीक्षक सावंतवाडी हे उपस्थित राहणार आहेत.
ग्रंथालयाच्या सन २०२४/२५ या वर्षभरात आजीव, साधारण व बाल वाचक गटातून वाचक सभासदांनी वाचन केलेल्या ग्रंथांची दखल घेऊन ग्रंथालयाने उत्कृष्ट वाचक २०२५ यासाठी वाचक सभासदांची निवड केली असून त्याचा यथोचित गौरव सदर कार्यक्रमात केला जाणार आहे. तरी ग्रंथप्रेमी, वाचनप्रेमी, हितचिंतक यांनी वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वाचन मंदिरच्या वतीने करण्यात आले आहे.

