*निगडी प्राधिकरणात दिवाळी पहाटमध्ये राहुल देशपांडे यांच्या गाण्यांची मैफल*
पिंपरी
शुक्रवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे ५:३० वाजता नियोजित महापौर निवास मैदान, निगडी प्राधिकरण येथे दीपावलीनिमित्त सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या सुरेल गाण्यांची मैफल आयोजित करण्यात आली आहे. विनाशुल्क असलेल्या या सुश्राव्य मैफलीचा लाभ सर्व नागरिकांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन आयोजक माजी उपमहापौर शैलजा मोरे आणि भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, भाजपा पदाधिकारी सलीम शिकलगार, अरुण थोरात आणि अतुल इनामदार यांनी केले आहे.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
