You are currently viewing श्री टागोर शिक्षण संस्थेचा माणुसकीचा संदेश पूरग्रस्तांना मदतीचा हात

श्री टागोर शिक्षण संस्थेचा माणुसकीचा संदेश पूरग्रस्तांना मदतीचा हात

इंद्रायणी नगर (भोसरी) :

नैसर्गिक आपत्तीच्या काळात माणुसकी आणि सामाजिक जबाबदारीचं भान जपत, श्री टागोर शिक्षण संस्था इंद्रायणी नगर येथील विद्यार्थी आणि शिक्षकवृंदाने मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी मदतीचा महत्त्वपूर्ण हात पुढे केला. शाळेने एकत्र येऊन जमा केलेलं साहित्य नुकतंच पूरग्रस्त भागातील गरजूंना सुपूर्द करण्यात आलं.

गेल्या महिन्यात मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं आणि अनेक कुटुंबे बेघर झाली होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन, श्री टागोर शिक्षण संस्थे मधील विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी, शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे ‘एक मदतीचा हात’ ही मोहीम सुरू केली.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

या मोहिमेत विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्त सहभाग घेतला. या उपक्रमात सुमारे १५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

या मदतीमध्ये मुख्यतः नवीन शालेय पाठ्यपुस्तके, वह्या, पेन-पेन्सिलचा संच, आणि काही इतर साहित्याचा समावेश होता, जे पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं नुकसान भरून काढण्यासाठी उपयुक्त ठरेल.

मदतीचं वाटप शाळेच्या प्रांगणात (पटांगणात) आयोजित केलेल्या एका छोटेखानी समारंभात हे सर्व साहित्य जमा करण्यात आलं. सदर सर्व साहित्य पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघ यांच्याकडे नुकतेच सुपूर्द करण्यात आलं.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, संबोधित करताना, “शिक्षण आपल्याला ज्ञानी बनवतं, पण माणुसकी आपल्याला माणूस म्हणून जगायला शिकवते. आज तुम्ही दाखवलेली संवेदनशीलता खूप मोलाची आहे,” असे गौरवोद्गार टागोर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार लांडे पाटील यांनी काढले.

संस्थेचे सचिव सुरेश फलके यांनीही विद्यार्थ्यांच्या या कार्याचं कौतुक केलं* आणि भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेण्याचं आवाहन केलं.

श्री टागोर शिक्षण संस्था मधील सर्व विद्यालयाने वेळेवर केलेल्या या मदतीमुळे पूरग्रस्त भागातील लोकांना मोठा आधार मिळाला आहे, तसेच समाजात सामाजिक बांधिलकीचा एक प्रेरणादायी संदेश पोहोचला आहे. विद्यार्थीदशेतच माणुसकीचे हे धडे गिरवले गेल्याबद्दल संपूर्ण भोसरी परिसरात शाळेचं अभिनंदन होत आहे

या वेळी मुख्याध्यापक श्री हनुमंत आगे, संतोष काळे, उद्धव ढोले, मनिषा गुरव उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा