You are currently viewing करून पहावे…

करून पहावे…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

     *करून पहावे…*

 

करून पहावे मला वाटते जंतरमंतर

मिटून जावे दोघांमधले थोडे अंतर

वय वाढते तसे वाढते आडमुठ्ठेपण

साठी बुद्धी नाठी झाली म्हणती सारे जण…

 

घरोघरी हा प्रकार दिसतो करती भणभण

नको वाटती वृद्ध घरातील करती तणतण

जावे वाटते घराबाहेरी वृद्धांनी या

मनावरी ते होते ओझे त्यांचे मणमण..

 

दोन पिढ्यातील तीन पिढ्यातील अंतर मोठे

वृद्ध बोलता घरालील मग टोचती काटे

सोसत नाही उधळपट्टी वयस्करांना

नवे मग म्हणती काळ बदलला शांत रहा ना…

 

ॲानलाईन रोजच आता पुडके येती

पार्सल येता घरातले मग धावत जाती

घरपोच त्या वस्तू येती धरबंध नच तो

नातू मात्र धावत जाऊन घेऊन येतो…

 

रोजच येतो किती हा कचरा किंमत नाही

पार्सल मधूनी काय न येते? मोठी नवलाई

पिझ्झा बर्गर पायताण ही काही मागवा

बाजारी या काय न मिळते? नाही वान वा…

 

बघत रहावे घरात जे जे येते ॲानलाईन

कुठे खर्चतो सांगा आपण आता क्वॅाईन

त्यांचे त्यांना करूच द्यावे त्यांचा जमाना

देवळात जाऊन शांतपणे मग तुम्ही

बसा ना…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा