You are currently viewing सैनिक पतसंस्थेची ‘युवा स्वावलंबी कर्ज योजना’ आणि ‘वीरांगना महिला कर्ज योजना’चा शुभारंभ

सैनिक पतसंस्थेची ‘युवा स्वावलंबी कर्ज योजना’ आणि ‘वीरांगना महिला कर्ज योजना’चा शुभारंभ

सावंतवाडी :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवक-युवतींना तसेच महिलांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना उद्योग व्यवसायात हातभार लावण्यासाठी सैनिक पतसंस्थेतर्फे युवा स्वावलंबी कर्ज योजना ‘उद्योगजकता अभियान’ सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्ह्यातील अनेक युवक-युवतींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असून आर्थिक अडचणीमुळे त्यांना ते शक्य होत नव्हते. त्यामुळे २१ ते ३५ वयोगटातील नवउद्योजकांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत उद्योग व्यवसाय उभारणीसाठी कर्ज स्वरूपात ७० टक्के रक्कम पतसंस्थेतर्फे दिली जाणार असून ३० टक्के रक्कम स्वतःची गुंतवणूक असणार आहे.

नोव्हेंबर २०२५ पासून संस्थेच्या सर्व शाखांमध्ये या योजनेचा प्रत्यक्ष शुभारंभ होणार आहे. इच्छुक युवक-युवतींनी आपल्या नजीकच्या शाखांशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.

तसेच कार्यरत महिलांसाठी ‘वीरांगना महिला कर्ज योजना’ सुरू करण्यात आली असून महिलांना पगार तारण, व्यवसाय तारण, पेंशन तारण अशा विविध प्रकारांत ₹५ लाखांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे.

‘युवा स्वावलंबी कर्ज योजनेअंतर्गत ₹७ लाखांपर्यंतचे कर्ज’ उपलब्ध होणार आहे. संस्थेने बँकांप्रमाणे CIBIL तपासणी यंत्रणाही सुरू केली आहे, ज्यामुळे अत्यंत कमी दरात ही सेवा मिळू शकेल.

ही माहिती संस्थेचे अध्यक्ष बाबुराव कविटकर व मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ यांनी दिली.

संस्थेचे पदाधिकारी म्हणून चंद्रकांत दाजी शिरसाट, दिनानाथ सावंत, सुभाष सावंत, भिवा गावडे, चंद्रशेखर जोशी, शांताराम पवार, बाबू वरक, शामसुंदर सावंत, संतोष मुसळे, गोपाळ बाईत आदींचा समावेश आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा