“शासन आपल्या दारी” मोहिमेत अंतर्गत मोबदला वाटप शिबिर संपन्न
सिंधुदुर्गनगरी
“शासन आपल्या दारी” मोहिमेअंतर्गत ज्या मोबदला धारकांनी अद्याप पर्यंत मोबदला घेतलेला नाही. अशा मोबदला धारकांना मोबदला वाटप करण्यासाठी ग्रामपंचायत ऐणारी ता. वैभववाडी येथे शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरामध्ये भूसंपादन प्रस्ताव क्र. २२/२००७ ऐणारी मधील एकूण 24 मोबदला धारकांना मोबदला मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात आली. तसेच इतर खातेदारांना कागदपत्रांविषयी व त्यांच्या समस्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आल्याची,माहिती उपविभागीय जलसंधारण अधिकारी शिरोडकर यांनी दिली.
या शिबिरास भुसंपादन उपजिल्हाधिकारी शारदा पोवार, सरपंच श्रीमती सुर्वे, पोलीस पाटील, ग्रामस्थ, भुईबावडा येथील मंडळ अधिकारी, तलाठी व उपविभागीय जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभागाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.

