कँटीनमध्ये स्फोटाने उडाला आगीचा भडका;
सुदैवाने जीवितहानी टळली
बांदा –
खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलच्या कँटीनमध्ये आज सायंकाळी भीषण स्फोट झाला. स्फोटानंतर आगीचा भडका उडाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सुदैवाने स्फोटाच्या वेळी कँटीन बंद असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कँटीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
स्फोटाची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. बांदा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
सध्या पोलीस घटनास्थळी तपास करत असून स्फोटाचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी चौकशी सुरू केली आहे.

