You are currently viewing कोंकणातली जुनी घरा…
कोंकणातली जुनी घरा

कोंकणातली जुनी घरा…

कोकण म्हटल्यार नजरेसमोर येता तो निसर्गाचो अद्भूत चमत्कार,
खरातर भरभरून दिल्यानं हा कोकणाक निसर्गानं,
आणि ता दिलेला टिकवची जबाबदारी सुद्धा होती ती आपल्या कोकणी माणसांची.
झाडापेडानी हिरव्यागार आसलेला आपला कोकण आज बऱ्याच ठिकाणी भकास होयत चललेला दिसता हा,
थंडगार गारवो जाणवायचो तेव्हा वर्षभर, आज पावसातय आंगातसून घाम गळता हा,
गरजे बदालले की गरजेपेक्षा जास्त माणूस नईन कायतरी सोधुक जाता,
तसो माणूस मातयेची, चिऱ्यांची भक्कम आसणारी कौलांची घरा पाडून, शिमेंट चो मारो आसणारी काँक्रीटची घरा बांधुक लागलो,
काँक्रिट, लोखांड तापला काय भितुर उकाडता म्हणानं, फॅन लायल्याण, ए शी लायल्याण…
सगळा करूनय समाधान नाय गावना म्हणान परत एकदा पर्यटनाच्या नावाखाली बागेत, डोंगरात, न्हयच्या काठार बांधलेल्या मातयेच्या घरात चार दिवस आरामाक जावक लागलो,
शेणानं सारयलेल्या जमनीर निजाक तेका बरा वाटाक लागला.
मग घोडा अडलेला ता खय???

होय,,,,
पुर्वजानी जपलेली जुनी मातयेची, आणि नंतर बांधलेली चिऱ्यांची नळ्यांची घरा हिच रवण्यासाठी खरोखर खूप उपयोगाची होती,
आरोग्याच्या दृष्टिकोणातसून बगली तर उत्तम होती.
हा भायरसून दिसाक सुंदर नसतीत,,,
पण तेच्या भितुर सुख होता, शांती होती.
कधीय दमान इल्यार नुसता भीतीक पाट टेकून रवला तरी भीतीचो थंडावो पाटीक जानवा होतो,
फॅन नसलो तरी गारवो असायचो त्या मातयेत…
कधीय थंडीपासून कुडकुडान इला तर तीच मातयेची भीत ऊब देय होती.
माणसांच्या गरजे परमान ती आपल्यात बदल करी.
मातयेचो चिकल करून एकावर एक डाळलेले पारे ते,
मातेयेचे पारे तेका मातयेचोच गिलावो, आणि गेरूचो रंग नायतर काव,,,
नाय मजबुतीक शिमिट, नाय वाटरप्रूफिंग पण त्या मातयेच्या पाऱ्यातसून कधी घरात पाणी इलेला ऐकिवात नाय,
आता प्लास्टर केल्यारय भीती पाजारतत.
फळयेचो नायतर वाश्याची छावणी घालून बारकेशे खिंडके करीत,
पण त्या दीड बाय दीडच्या खिंडकेतसून जी काय वाऱ्याची झुळूक येय, तेंनी कधी घरात गरमी झालेली बगलीच नाय.
नाय सलायडिंग नाय ग्रीला,,,
पण लाकडाच्या बारांचा सोंदर्य आसायचा त्या खिंडकेतनी,,,
फुडला दार नी पाटला दार, ता पण उभ्या फळयेचा,,,,
तेका आडक ती आडो नायतर साखळी,,
खोलयेक आसला तर दार नायतर पातळाच्या जुन्याराचो रशयेन बांधलेलो पदडो,,,,
मातयेची घरा पण एशी होती,,,
तेंच्यार असलेले नळेच ती मजा देय होते,
उलटे सुलटे बसयलेले नळे भितूरसून भारी हवा आत सोडीत,
तेच्यामुळा घर हवेशीर रवा,
आता चार पाच फुटांचे खिंडके आसतत,
पण हवा मात्र इकतची फॅनाची घेवची लागता, लायटीची मॉपशी बिला भरून,,
कितको तो पावस वतांदे, नळ्यातसून पाणी कधी भितुर येय नाय,
माणग्यांच्या भेतार शिवणावळ तेंची…
तरास एकच होतो, दरवर्षी नळे परतूचे लागत,
मजुरेर नाय, मिया तुझ्या घराक, तिया माझ्या घराक मदतीक येवचा ही गोड भावना होती,
आपुलकी, जिवाळो, परेम होता,
आता पण आसा फक्त ता पैशाकडे बघून,,,
शेणाचे जमनी होते, आठ- धा दिवसांनी सारयत होती बायका,
त्या सारयन्यात पण मजा होती,
बोटांनी मस्त रेखणी करून वेगवेगळे आकार देवन शेणाक पण रूपवान करीत होती,
चुन्याच्या पाणयात बोटा बुडवन तेचार रांगोळी काडीत,,,,
त्या सारयलेल्या जमनीर निजाची मजा मार्बल च्या लादयेत सुद्धा आता गावाची नाय.
एका खोलयेत व्हायन होता, जात्यार पीठ दळायची, गायी म्हशींचा दूध इरजनाक लावन लाकडाच्या रविन घुसळून ताक, लोणी काढायचे,,,
ह्या सगळ्यात एक मजा होती, आजच्या घरात तेंका जागाय रवली नाय, आणि गरजय उरली नाय….

मातयेच्या घरांबरोबर पैसो हडको आसणाऱ्यांनी चिऱ्यांची आणि कौलांची घरा बांधली.
दोन फुटांपासून साह सात फुटांचे अक्के चिरे एकाच भीतीच्या खांबाक लायलेले आजपण देवगडात दिसतत. खांबाक सहा, सात फुटाचो एकच उभो चिरो, आणि लोट्यार भिंतीक चार पाच फुटांचे आडवे दोन चिरे लायले की भीत सोपली बांधून. (माझ्या बापाशीन सुद्धा तसले चिरे लायलेत)
आजच्या मशीन कट पेक्षा गुळगुळीत तासलेले चिरे बघून आश्चर्य वाटता त्या कारागिरांच्या कामाचा,
भायरसून आणि भितूरसून प्लास्टर नसला तरी आताय त्या घरातनी कधी पावसाचा पाणी इला नाय,
घरातल्या चुलीच्या धुकटान घर काळा होय, पण घरात कदी वाळवी नाय लागायची.
मच्छर नावाचो कीटक कधी बगलोच नाय.
मोठमोठ्या वाश्यांचो फळयेचो माळो, लाकडाचो दादर, आणि वर वाशे, रिपी मारून कौलांचा छप्पर…
चिऱ्यांच्या घरात वायच सोय जादा गावली, मोरी इली, खिंडके मोठे झाले, दारा मोठी झाली…
पण जमनी मात्र शेणाचे रवले,,,
दाराफुडे सारयलेला, मातयेच्या पेळेंचा खळा,
माणग्यांचो चुडता घातलेलो, गवताचे पेंडे टाकलेलो माटव,
लायट नसली तरी चांदण्यात बसान गजाली मारूक लय मजा येय होती.
आता मात्र चांदना आसता, पण गजालेक माणसा नाय, शेजार पाजार कोणाच्या दारार जायत नाय.
काळ बदाललो,,,,
गरज आणि आवड बदालली,,,
मातयेची घरा कटकटीची वाटाक लागली,
एकांतात उभी आसलेली घरा, पाऱ्यासकट जमीनदोस्त झाली…
हातात पैसो इलो,
नसलो पैसो तर जमीन जागो इकुन लोकांनी शिमेंटची शिलापाची घरा बांदली,
पावसात पाजारतत, गळतत,
उनाळ्यात घामानं उकडान मरतत,
एशी लायतत, आजारपणा येतत…
तसा मग येवाजता,,,,
मातयेच्या घरात सुख होता…
म्हणान सुट्टी काढून पर्यटनाच्या नावाखाली परत एकदा शोध घेतत,,,,
खय मातयेच्या घरात आठवडोभर निसर्गाच्या कुशीत रवाक गावात काय???
आणि भाड्याक घर घेवन इकतचा सुख घेवक तेंचि पावला परत एकदा गावाकडे वळतत…
मातयेच्या घरात…
जा सुख जलामल्यापासून भोगल्यानी होता ताच सुख इकत घेवक….

(दीपक पटेकर)

प्रतिक्रिया व्यक्त करा