You are currently viewing राजकीय चारोळी

राजकीय चारोळी

*ज्येष्ठ लेखक कवी पत्रकार बाबू फिलिप्स डिसोजा कुमठेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*राजकीय चारोळी*

 

यांचे वार त्यांचे पलटवार

विरोधक शोधती संधी अशी

मुद्द्यांवर गुद्द्यांचे कारभार

लोकशाही हताश मिंधी कशी

-१-

लोकसंख्येपेक्षा मतदान अधिक

मेलेल्यांनी केले मतदान अचंबा

ईव्हीएम यंत्रे होतात आता हॅक

खऱ्या मतदारांचा मात्र खोळंबा

-२-

वाढवले होते जीएसटी चे दर

मनमानी बहुमताच्या जोरावर

अमेरिकेचा टॅरिफ धक्का जबर

जाहीरातींनी घेती आता श्रेय वर

-३-

सरन्यायाधीशांवर बूट फेक

सनातनींचा लपत नाही बेत

सरकार कारवाईला कसे मूक

लोकशाही अजून कशी अचेत

-४-

बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर

पुनावळे पुणे ३३

प्रतिक्रिया व्यक्त करा