You are currently viewing समाजोपयोगी उपक्रमाने भारतीय वायूसेनादिन साजरा

समाजोपयोगी उपक्रमाने भारतीय वायूसेनादिन साजरा

*समाजोपयोगी उपक्रमाने भारतीय वायूसेनादिन साजरा*

पिंपरी

भारतीय भूतपूर्व सैनिक संघटना, पुणे जिल्हा शाखेतर्फे ९३ वा भारतीय वायुसेनादिन संघटनेच्या ज्ञानेश्वर उद्यान, प्राधिकरण, निगडी येथील कार्यालयात समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष सुभेदार मेजर यशवंत महाडिक, वकील सार्जंट चौधरी, सचिव वॉरंट ऑफिसर बाळासाहेब आबनावे तसेच संघटनेचे बहुसंख्य सदस्य आणि महिला उपस्थित होते. मान्यवरांनी सर्व माजी वायूसैनिक आणि त्यांच्या परिवारास भारतीय वायुसेनादिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत देशासाठी त्यांच्या सेवाभाव व योगदानाचे मनःपूर्वक कौतुक केले.

या प्रसंगी संघटनेने पूरग्रस्त नागरिकांसाठी मदतकार्याचा उपक्रम राबवला. महिला, पुरुष आणि मुलांसाठी कपडे, धान्य, किराणा सामान, शालेय साहित्य, स्वयंपाकासाठी भांडी आदी आवश्यक वस्तू संकलित करून, संघटनेचे पदाधिकारी वॉरंट ऑफिसर दत्तात्रय लोहकरे आणि त्यांच्या पत्नी, सार्जंट जयंत डोफे आणि एम सी एफचे मुख्य जयपाल दगडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. या कार्यासाठी संघटनेच्या सदस्यांनी आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी मौलिक योगदान दिले.

कार्यक्रमादरम्यान, माजी वायूसैनिक सार्जंट जयंत डोफे व त्यांच्या परिवाराने संघटनेला पी.ए. सिस्टीम संच भेट दिला. त्याप्रीत्यर्थ संघटनेच्या वतीने त्यांना प्रशस्तिपत्रक प्रदान करून त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सर्व उपस्थित माजी सैनिकांनी देशसेवेच्या स्मृती जागवून, ‘जय हिंद!’ , ‘जय वायूसैनिक!’ या घोषणांनी वातावरण भारून टाकले होते.

-प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा