*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आकडेमोड.. वयाची ..!!*
वयांत आलेले क्षण
कधी कधी लपवावेसे वाटतांत
अभावातून स्वभावाकडे जातांना
आकडेमोड करायला लावतांत
अल्लड.. अवखळ ..उनाड वय
बालवयांत .. वाढवासे वाटते
तरूण वयात कमी करावसे वाटते
साठीत वय …आठवावे लागते
सत्तरीत वयच वयाला विसरतं
वयाला ..खरतर पटापट
प्रौढ …व्हायचं असत
कां ..कधी ..कुठे .. कसं
वय स्वतःच वयाला लपवत जात
हाच आनंद घेत ते पुढे जात
या फुलपंखी आनंदाला
कधीतरी कडवटपणा येतो..
वय झाल्याचा कुणाचा आवाज
काळजाला दागण्या देतो..
लपलेले वय लपवलेले वय
नकळत ठरवून आकडेमोड करतं
स्वतःचा आनंद जपण्याचा प्रयत्न
आयुष्यभर वयचं करू लागतं ..
कधीच कुणाला वय विचारू नये
स्वतःचं वय कधीच सांगू नये..!!
बाबा ठाकूर

