You are currently viewing कणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर

कणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर

१७ प्रभागांसाठी आरक्षण जाहीर; महिला उमेदवारांसाठी मोठी संधी

कणकवली  :

राज्यातील नगरपंचायती व नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी वेगाने सुरू झाली असून, या पार्श्वभूमीवर कणकवली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठीची आरक्षण सोडत बुधवारी येथील नगरपंचायतच्या सभागृहात पार पडली. नवीन आदेशानुसार यावर्षीपासून आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर, मुख्याधिकारी गौरी पाटील, कणकवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रविंद्र नानचे, महिला पोलीस विनया सावंत यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सदरची आरक्षण सोडत शांततेत व सुरळीतपणे पार पडली.

जाहीर झालेले आरक्षण पुढीलप्रमाणे – प्रभाग क्र. १ सर्वसाधारण, प्रभाग क्र. २ सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र. ३ सर्वसाधारण, प्रभाग क्र. ४ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), प्रभाग क्र. ५ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), प्रभाग क्र. ६ सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र. ७ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), प्रभाग क्र. ८ अनुसूचित जाती, प्रभाग क्र. ९ सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र. १० सर्वसाधारण( महिला), प्रभाग क्र. ११ अनुसूचित जाती (महिला), प्रभाग क्र. १२ सर्वसाधारण (महिला), प्रभाग क्र. १३ नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग क्र. १४ नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग क्र. १५ सर्वसाधारण, प्रभाग क्र. १६ सर्वसाधारण, प्रभाग क्र. १७ सर्वसाधारण

प्रतिक्रिया व्यक्त करा