You are currently viewing दिव्यांग लाभार्थ्यांच्या निवृत्तीवेतनात मोठी वाढ

दिव्यांग लाभार्थ्यांच्या निवृत्तीवेतनात मोठी वाढ

दिव्यांग लाभार्थ्यांच्या निवृत्तीवेतनात मोठी वाढ;

दरमहा २५०० रुपये मिळणार

सिंधुदुर्ग

संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या मासिक आर्थिक सहाय्यात राज्य शासनाने मोठी वाढ केली आहे. याअंतर्गत मिळणारी रक्कम १५०० रुपयांवरून थेट २५०० रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.

या निर्णयाला शासनाने “विसयो २०२५/प्र.क्र.६९/ सप्टेंबर २०२५” या शासन निर्णयाद्वारे मंजुरी दिली असून, ऑक्टोबर २०२५ पासून ही सुधारित रक्कम लागू होणार आहे. त्यामुळे दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात वाढीव रक्कम जमा होणार आहे.

सदर शासन निर्णय www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, सिंधुदुर्ग शाखेचे अध्यक्ष यांनी सर्व दिव्यांग बांधवांनी या निर्णयाची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे.

हा निर्णय दिव्यांग बांधवांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा