You are currently viewing बाप दुर्लक्षित असतो

बाप दुर्लक्षित असतो

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*बाप दुर्लक्षित असतो*

 

******************

सतत आई आई म्हणून

होकारनारा मुलगा

कधी बाप शोधत नाहीं

आईला शोधणारी नजर

कधी बापाकडे वळत नाही

 

दुसऱ्यांच्या स्वप्नासाठी

अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या

बापाने फक्त संघर्ष करत राहायचं

आणि मन मारून स्वतःच जगणं विसरायचं

 

कधीच सागंत नाही बाप

त्यांच्या संघर्षाच्या वेदना नी्

त्या कुणाला कळत नाही

त्याच्या तळ पायांच्या भेगांना

साधी फुंकर ही मिळत नाही

 

कधीच नाही म्हणत नाही

सारं काही स्विकारत असतो

काहीच कमी पडायला नको म्हणून

कष्टाच्या वाटेवर धावत असतो

 

खिशात काही नसलं ना तरी

कधी रिकाम्या हाताने जाणार नाही

कुणाच्याही डोळ्यात अश्रू येऊ देणार नाही

जे सांगितलं ना ते आणून देत असतो

आनंदाने फुलणारे चेहरे डोळेभरून पाहत असतो

 

कोणी निराशा व्हायला नको

याची बापाला जास्त काळजी असते

पण बापाची काळजी मात्र

कुणाच्याही चेहऱ्यावर नसते

 

मनासारखं झालं की

सारेच अवतीभोवती दिसतील

पण एकांतात त्यांच्यासोबत

कोणी नसतील

 

एकटाच बसुन बाप त्याच्या

गहिवरलेल्या जखमांशी बोलत असतो

जड अंतःकरणाने स्वतःच स्वतःची

समजूत काढत असतो

 

अरै कधीतरी केव्हातरी

थकून भागून आलेल्या बापाचा

घाम कोणी पुसलाय का

कुटूंबासाठी राबणारा बाप

कोणी समजू घेतलाय का

 

खरंतर बाप सर्वांसाठी असतो

पण बापासाठी कोणी नसतो

सर्वांना आपलसं करून घेणारा बाप

मात्र दुर्लक्षितच असतो

 

*(संजय धनगव्हाळ)*

*(अर्थात कुसूमाई)*

९४२२८९२६१८

९५७९११३५४७

प्रतिक्रिया व्यक्त करा