*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कॅमेर्यासोबतच..माझं जगणं…!!*
नकोस दृष्ट लावूस
या सुंदर एकाकीपणाला
कॅमे-याची सोबत पुरेशी
स्वतःचं वेगळेपण जपायला..
आजही तरूण नसानसांतून
पूर्वीच..रक्त..धावत..उसळतं
आजही..प्रकाश पिता येतो
जगण्याचा उत्सव करतो..
पुन्हा सांगतो तुला
नको दृष्ट लावूस
निसटलेलं ऐश्वर्य..लाभू दे
पुन्हा..शाप देऊ नकोस..
कॅमेर्यासोबतच्या जगण्याने मला
परकेपणाचा लळा लागला
हल्ली ओळखीचाही मला
तिऱ्हाईत वाटू..लागला..
वर्षे..निसटून उलटून जातात
प्रतिबिंबात अडकतो श्वास
हातात अडकवलेला कॅमेराच
देतो..सुखी जीवनाचा भास..
बाबा ठाकूर

