You are currently viewing गोडवे गाईल दिवसा स्वप्नात

गोडवे गाईल दिवसा स्वप्नात

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गोडवे गाईल दिवसा स्वप्नात*

 

चंद्र पाहून पृथ्वीवरला

*उडून गेली झोप त्वरीत*

बारीक डोळे करून मोठे

बसली होतीस *दूध पीत*

//1//

आश्चर्याचा पचवून धक्का

चिमटा घेतला मी स्वत:ला

चंद्रीके हाती होता प्याला

पाहून जीव भांड्यात पडला

//2//

नव्हती दुसरी अन्य कुणी

बसली होतीस *दूध पीत*

दिल्या शुभेच्छा कोजागिरीच्या

जशी पाळतो नेहमी *रीत*

//3//

तृप्त जाहलो मिळता दर्शन

पाहून *चंद्राला गच्चीवर*

आनंद झाला तेव्हा मजला

आता आलोय मी भानावर

//4//

माळून गजरा शुभ्र पांढरा

बसली होतीस *गच्चीवर*

शालू लाल तो पाहून भुलला

मोरगावचा गणपती मयुरेश्वर

//5//

हास्य तुझे ग ऐकून अंधही

पडून जाईल *तुझ्या प्रेमात*

डोळसाचे तर नको विचारू

गोडवे गाईल दिवसा स्वप्नात

//6//

 

विनायक जोशी 🖋️ठाणे

मीलनध्वनी/9324324157

मंगळवार 07 आक्टोबर 2025

प्रतिक्रिया व्यक्त करा