You are currently viewing केंद्रीय मंत्री नाम.रामदास आठवले 9 ऑक्टोबरला गोव्यात येणार-

केंद्रीय मंत्री नाम.रामदास आठवले 9 ऑक्टोबरला गोव्यात येणार-

केंद्रीय मंत्री नाम.रामदास आठवले 9 ऑक्टोबरला गोव्यात येणार-

कालकथीत बाळासाहेब बनसोडे यांच्या शोकसभेला उपस्थित राहणार!

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.नाम.रामदास आठवले साहेब हे गुरूवार दि.9 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11.30 वा.गोव्यात येत आहेत,नुकतेच आर.पी.आय.गोवा राज्याचे अध्यक्ष बाळासाहेब बनसोडे यांचे दुखद निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गोवा प्रदेश तर्फे गोवा वास्को येथे शोकसभा आयोजित करण्यात आलेली आहे,नाम.आठवले हे शोकसभेला उपस्थित राहून आदरांजली अर्पण करणार आहेत तसेच कालकथीत -बनसोडे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करणार आहेत.त्यांच्या समवेत गोव्याचे खासदार -सदानंदशेट तानावडे,भाजप गोवा प्रदेश अध्यक्ष-दामोदर नाईक,आमदार -दाजी साळकर,आमदार -प्रविण आर्लेकर,आर.पी.आय.महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा गोवा संपर्क प्रमुख -युवराज सावंत,केंद्रीय सचिव-सुरेश बारशिंगे,केंद्रीय सचिव-दयाल बहादुरे, आर.पी.आय.पदवीधर मतदार संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष-घनशाम चिरणकर,दलीत पँथर महाराष्ट्र -अरूण पाटारे,महाराष्ट्र प्रदेश सहसचिव-रमाकांत जाधव,कोकण अध्यक्ष-प्रकाश मोरे,सिंधुदुर्ग अध्यक्ष -अजीत कदम,उपस्थित राहणार असल्याची माहिती आर.पी.आय.गोवा प्रदेश प्रभारी-सतीश कोरगांवकर, गोवा कार्याध्यक्ष-उमेश हसापूरकर,माजी अध्यक्ष -दिगंबर तेंडूलकर,गोवा सहसचिव-कृष्णा कोरगांवकर,वास्को शहराध्यक्ष – रहिम खान,संघटक -राम वाघमारे,संघटक -लालचंद पासी यांनी माहिती दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा