You are currently viewing एस के एस फास्टनर्स, चाकण येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

एस के एस फास्टनर्स, चाकण येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

*एस के एस फास्टनर्स, चाकण येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न*

पिंपरी

एस के एस मेंबर्स वेल्फेअर सोसायटी, चाकण आणि भारत विकास परिषद, पिंपरी – चिंचवड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने सुशील बिंदल, मॅनेजिंग डायरेक्टर, एस के एस फास्टनर्स लिमिटेड यांचे वडील कै. फूलचंद बिंदल यांच्या ३१ व्या पुण्यतिथीनिमित्त
एस के एस फास्टनर्स लिमिटेड, चाकण येथे जनकल्याण रक्तपेढी, पुणे यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सेवाकार्यात कंपनीतील वरिष्ठ पदाधिकारी, कामगार व भारत विकास परिषद पिंपरी – चिंचवड शाखेचे ७ सदस्य अशा एकूण १०९ जणांनी रक्तदान करून आपले समाजाप्रति असलेले दायित्व सिद्ध केले. यामध्ये २ स्त्री कर्मचाऱ्यांचाही सहभाग होता. गेली २ वर्षे एकूण ४ शिबिरांमध्ये एस के एस फास्टनर्स लिमिटेड मधील ४०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले आहे.

कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलन आणि कै. फूलचंद बिंदल यांना आदरांजली वाहून करण्यात आला. यावेळी एस के एस फास्टनर्स लिमिटेडच्या डायरेक्टर मीनल बिंदल, विनोद जैन, राजीव अगरवाल, राहुल दुदानी, हेड-क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टमचे पवन गायकवाड, तसेच भारत विकास परिषद, पिंपरी – चिंचवड शाखेचे अध्यक्ष दर्शन दुगड आणि अन्य सभासद उपस्थित होते.

सांगता कार्यक्रमात टाटा मोटर्सचे निवृत्त मनुष्यबळ वरिष्ठ अधिकारी मनोहर पारळकर यांनी मार्गदर्शन केले आणि सर्व रक्तदान केलेल्या कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने एस के एस फास्टनर्स लिमिटेड कंपनीला प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले. भारत विकास परिषद, एस के एस फास्टनर्स लिमिटेड मधील वरिष्ठ पदाधिकारी, रक्तदाते, कर्मचारी व स्वयंसेवक तसेच जनकल्याण रक्तपेढीमधील डॉक्टर, तंत्रज्ञ यांचेप्रति ऋण व्यक्त करून पवन गायकवाड यांनी आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा