MEERA संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद —
माजी विद्यार्थी व पालकांकडून छत्रपती शिवाजी विद्यालयाला लॅपटॉप भेट;
MEERA कडून शालेय पुस्तके प्रदान
तिथवली (ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग) —
ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने Modern Education Empowerment and Research Association (MEERA) संस्थेने केलेल्या आवाहनाला शाळेचे माजी विद्यार्थी आणि पालकवर्ग यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
या उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी विद्यामंदिर, तिथवली (वैभववाडी) या शाळेला माजी विद्यार्थी आणि पालकांच्या देणगीतून New Dell 15 Laptop, Black Wireless Mouse आणि High-Speed Wi-Fi Setup भेट म्हणून प्रदान करण्यात आला.
या उपक्रमामुळे शाळेत कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) आणि तंत्रज्ञान विषयक आधुनिक शिक्षण सुरू करण्यास मदत होणार आहे.
या सामाजिक कार्यासाठी MEERA संस्थेच्या माध्यमातून एकत्र आलेल्या माजी विद्यार्थी व पालकांमध्ये खालील दात्यांचा समावेश आहे —
· श्री. अमोल माईंडणकर श्री. विलास माईंडणकर सौ. अंजली आणि श्री. रमेश मणेरीकर श्री. प्रशांत उत्तम मणेरीकर श्री. तन्मय विहारी मणेरीकर श्री. अजित राठोड श्री. श्रीकृष्ण गोविंद डोके
सौ. दीपाली विजय माईणकर सौ. गीत वरुण माईणकर श्री. कुणाल विजय माईंडणकर सौ. वैशाली विजय माईंडणकर श्री. विजय माईणकर श्री. चंद्रकांत (बाबू) काडगे श्री. प्रमोद चंद्रकांत काडगे श्री. तेजस शरद माईंडणकर सौ. पल्लवी शशांक दुराफे सौ. स्नेहा सचिन भावे सौ. गौरी दिलीप परब
तसेच या प्रसंगी MEERA संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी शालेय उपयोगी पुस्तके आणि अभ्यास साहित्य भेट स्वरूपात देण्यात आले. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, विचारशक्ती आणि ज्ञानवृद्धी वाढविण्याचा हेतू संस्थेचा आहे.
MEERA अध्यक्ष गुलजार काझी यांचे मनोगत
“आधुनिक काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि रोबोटिक्स या विषयांचे शिक्षण जगभरात महत्त्वाचे बनले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही या नवतंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे, यासाठी MEERA संस्था कटिबद्ध आहे. लवकरच छत्रपती शिवाजी विद्यामंदिर, तिथवली या शाळेत MEERA संस्थेच्या माध्यमातून AI आणि रोबोटिक्स शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्यासोबतच सर्जनशीलता, नवोन्मेषी विचार आणि भविष्याभिमुख दृष्टी विकसित करण्याची संधी मिळेल.”
🎓 कार्यक्रमास उपस्थित मान्यवर
या उपक्रमाच्या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य रिहाना काझी, अमोल माईणकर, विजय माईणकर, वैशाली माईणकर, दीपाली माईणकर, गिरीश माईणकर, ओंकार इस्वलकर, प्रमोद काडगे, दिलीप परब, गौरी परब, तसेच शाळेचे मुख्याध्यापक सुतार सर, सुतार मॅडम, झाटे सर, उर्णे मॅडम, आणि MEERA संस्थेचे अध्यक्ष गुलजार काझी उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापकांनी MEERA संस्था आणि सर्व दात्यांचे मनःपूर्वक आभार मानले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात नवतंत्रज्ञानाची नवी लाट निर्माण होणार असल्याचे सर्वांनी नमूद केले.

