पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयाच्यावतीने उपक्रम
८ ते १४ ऑक्टोबर दरम्यान मोफत वैद्यकीय तपासणी व उपचार सेवा
सिंधुदुर्ग :
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील मच्छीमारांसाठी देवगड, वेंगुर्ले आणि मालवण या तीन ठिकाणी मोफत वैद्यकीय तपासणी व आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत.
८ ऑक्टोबर: सकाळी १० ते सायं. ५ — ग्रामीण रुग्णालय, देवगड
१० ऑक्टोबर: सकाळी १० ते सायं. ५ — ग्रामीण रुग्णालय, वेंगुर्ले
१४ ऑक्टोबर: सकाळी १० ते सायं. ५ — ग्रामीण रुग्णालय, मालवण
या शिबिरांमध्ये मच्छीमार बांधवांना विविध आरोग्यविषयक तपासण्या मोफत करून घेता येणार आहेत. सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांनी जिल्ह्यातील सर्व मच्छीमारांनी या शिबिरांत सहभागी होऊन आपल्या आरोग्याची मोफत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.

