*आम. निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मंजूर*
कुडाळ :
कुडाळ व मालवण तालुक्यातीसाठी एकूण १८ ट्रान्सफार्मरच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून यात डिकवल वरचीवाडी, कुणकवळे बागवाडी, गोळवण सावरवाड, आचरा हिर्लेवाडी, तळगाव शेळवणेवाडी, काळसे परबवाडी, कट्टा बाजारपेठ, कुडाळ मच्छीमार्केट, पिंगुळी गुढीपुर, मालवण धुरीवाडा, चेंदवन वेलवाडी, वालावल आर्कचापूल, शासकीय तंत्रनिकेतन, देवली वाघवणे, जांभवडे कुंभारवाडी, मांडकुली भोईवाडी, निवजे, कसाल बाजारपेठ, आंबेरी गोसावीवाडी, वेताळ बांबर्डे कदम वाडी, या कमी दाबाने वीजपुरवठा होणाऱ्या भागात नवीन ट्रान्सफार्मरसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या बाबातची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली असून आमदार निलेश राणे यांच्या जवळ कुडाळ मालवण तालुक्यातील जनतेच्या मागणीनुसार हे ट्रान्सफार्मर मंजूर करण्यात आले आहेत. विज यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी आमदार निलेश राणे हे तत्पर असून येत्या काळात उर्वरित कामांना मंजुरी मिळणार आहे.
