You are currently viewing राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा ३ डिसेंबर २०२५ रोजी सिंधुदुर्गात होणार

राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा ३ डिसेंबर २०२५ रोजी सिंधुदुर्गात होणार

राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा ३ डिसेंबर २०२५ रोजी सिंधुदुर्गात होणार

दिव्यांग सक्षमीकरण व विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा होणार गौरव

कसाल (ता. कुडाळ) —

सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल यांच्या वतीने यावर्षी प्रथमच राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, हा सोहळा दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी भव्यदिव्य पद्धतीने संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमात शैक्षणिक, क्रीडा, रोजगार/स्वयंरोजगार, सामाजिक योगदान, विशेष प्रतिभा, प्रेरणादायी व्यक्तिमत्व तसेच आयुष्य गौरव पुरस्कार या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. याचबरोबर दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असणाऱ्यांचाही गौरव होणार आहे.

या पुरस्कारासाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०२५ असून, इच्छुकांनी आपली सर्व माहिती खालील पत्त्यावर पाठवावी:

अध्यक्ष – श्री. अनिल शिंगाडे
साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल
मोबाईल: 9765979450

कार्यालयाचा पत्ता:
मु.पो. कसाल, मनिषा कोल्ड्रिंक्स व बांदेकर मेडिकलच्या बाजूला,
ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग
फोन: 9623655142 / 9322073992

अध्यक्ष श्री. अनिल शिंगाडे यांनी समाजातील कार्यकर्त्यांना या पुरस्कारासाठी नोंदणी करून सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा