You are currently viewing समीर नलावडे यांचा उपक्रम…

समीर नलावडे यांचा उपक्रम…

समीर नलावडे यांचा उपक्रम….

कणकवलीत १५ ते १९ ऑक्टोबर दरम्यान दिवाळी बाजार; स्थानिक उत्पादकांना मंच

कणकवली :

कणकवली शहरातील स्थानिक महिलांना आणि पारंपरिक कुंभार व्यवसाय करणाऱ्या बांधवांना आपल्या हातगिरीच्या वस्तूंची विक्री करता यावी, यासाठी भाजप शहर विभाग व समीर नलावडे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाही दिवाळी बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे.

हा बाजार १५ ते १९ ऑक्टोबर दरम्यान कणकवलीतील उड्डाण पुलाखालील जागेत भरणार असून, सलग आठव्या वर्षी हा उपक्रम राबविला जात आहे.

या बाजारात ४० स्टॉल्स उपलब्ध असून, यामध्ये ३० स्टॉल्स बचत गटांच्या महिलांसाठी, तर १० स्टॉल्स कुंभार समाजासाठी राखीव आहेत. फराळाचे पदार्थ, दिवे, पणत्या, कंदील आणि विविध पारंपरिक वस्तू येथे विक्रीस उपलब्ध असतील.

दिवाळी बाजाराचे उद्घाटन १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.

बाजारातील प्रत्येक विक्रेत्यास टेबल, खुर्ची आणि लाईटची मोफत सुविधा पुरवली जाणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

या उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिक उत्पादकांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे. इच्छुकांनी नाव नोंदणीसाठी भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे (९४२२३८१९००) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा