You are currently viewing ड्रोन कॅमेराद्वारे बेपत्ता मृतदेहांचा शोध

ड्रोन कॅमेराद्वारे बेपत्ता मृतदेहांचा शोध

ड्रोन कॅमेराद्वारे बेपत्ता मृतदेहांचा शोध;

मृतदेह बाहेर काढण्याचं प्रशासनासमोर मोठं आव्हान

वेंगुर्ला :

शिरोडा-वेळागर समुद्र दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या व्यक्तींपैकी दोन मृतदेह ड्रोन कॅमेराद्वारे आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. वेंगुर्ला समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे ८ किलोमीटर अंतरावर एक मृतदेह तर, केळुस समुद्रकिनाऱ्यापासून ७ ते ८ किलोमीटर अंतरावर दुसरा मृतदेह दिसून आल्याची माहिती आहे.

दुर्घटनेनंतर प्रशासन, कोस्ट गार्ड, स्थानिक पातळीवरील पथकं, आणि बचाव पथकांकडून शोध मोहीम सुरु आहे. मात्र, मृतदेह खोल समुद्रात आणि ज्या भागात सापडले आहेत, तिथे पोहोचणं अत्यंत अवघड असल्यामुळे त्यांना बाहेर काढणं प्रशासनासमोर मोठं आव्हान ठरत आहे.

स्थानिक प्रशासनाने नौदल, मत्स्य व्यवसाय विभाग, आणि अन्य तज्ज्ञांच्या मदतीने पुढील टप्प्याची तयारी सुरू केली आहे. घटनास्थळी संताप आणि हळहळ व्यक्त होत असून, नागरिकांनी प्रशासनाकडून लवकरात लवकर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा