*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आम्ही जेष्ठ*
वृत्त~लवंगलता*(८+८+८+४)
सखया आम्ही जमलो होतो मोठ्या उत्साहाने
विसरुन आम्ही गेलो होतो वय ते पूर्णपणाने
बालिकाच जणु षोडश वर्षे शाळकरी का पोरी
हर्षभराने होतो नाचत कसली आम्हा चोरी
किती रंगला भोंडला असा हा जेष्ठ मैत्रीणींचा
मोद आगळा खिरापती त्या ओळखुनी घेण्याचा
आयुष्याच्या उभ्या आडव्या मार्गावरुनी गेलो
ठेच लागली जेव्हा जेव्हा माघारी ना वळलो
सुख दुःखांना साहत साहत जीवन जगलो आम्ही
क्षण हर्षाचा असा एकही सोडत नाही आम्ही
हत्ती गेला शेपुट उरले दिवस आजचा अपुला
बात उद्याची उद्या करूया क्लेष खेद हो कसला
*अरुणा मुल्हेरकर*
*मिशिगन*
०४/१०/२०२५

