You are currently viewing दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न नमस्कार

दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न नमस्कार

*दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न*

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशिय शिक्षण संस्था कसाल सिंधुदुर्ग व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग व सह आयोजक स्व. सुनील तळेकर चॅरीटेबल ट्रस्ट तळेरे व ग्रामपंचायत तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक ०३/१०/२०२५ रोजी डॉ. एम.डी.देसाई सभागृह वामनराव महाडिक विद्यालय तळेरे पंचक्रोशीतील सर्व दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा सकाळी १०.०० वाजता संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये तळेरे गावचे सरपंच हनुमंत तळेकर, सुनील चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मा.श्री सुरेश तळेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत तळेकर, तळेरे गावचे पोलीस पाटील चंद्रकांत जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष तळेरे निलेश सौरभ, वाचनालय अध्यक्ष नारायण वळंजू, वाचनालय उपाध्यक्ष शशांक तळेकर, प्राचार्य अविनाश मांजरेकर, स्कूल कमिटी सदस्य शरद वायगणकर, संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सर, जिल्हा समन्वयक दीपक कापसे, संदीप घाडी, निलेश तळेकर,सुनील तांबे तसेच संस्था कर्मचारी विशाखा कासले, दळवी मॅडम, हर्षद खरात आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या वतीने हेलन किलर, साईबाबा, स्व. सुनील तळेकर, शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून व स्वागत समारंभ करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सरांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. संस्था कर्मचारी कासले मॅडम यांनी संस्थेचे अहवाल वाचन केले.तसेच तळेरे गावचे सरपंच तळेकर सर यांनी दिव्यांग बांधवांना अमूल्य असे मार्गदर्शन केले. वामनराव महाडिक विद्यालयचे प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी दिव्यांग बांधवांना अमूल्य असे मार्गदर्शन केले. व ते म्हणाले अनिल शिंगाडे सर हे स्वतः अंध असून त्याचं काम खूप वाखडण्याजोग कौतुकास्पद आहे. या मेळाव्यामध्ये दिव्याग बांधवांचे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्रासाठी कागदपत्रे घेतली. काही दिव्यांग बांधवांचे रेल्वेपास करण्यासाठी कागदपत्रे घेतली. एका दिव्यांग बांधवांला काठी देण्यात आली. व चार दिव्यांग बांधवांना कानाची मशीन देण्यात आली.या मेळाव्याला ५० हून जास्त दीव्यांग उपस्थित होते. स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट व तळेरे ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व दिव्यांगासाठी नाष्टा व जेवणाची व्यवस्था केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश तळेकर यांनी केले.संस्था कर्मचारी दळवी मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा