You are currently viewing सावंतवाडीतील परिक्षीत मांजरेकर यांची शिंदे गट शिवसेना जिल्हा सचिवपदी नियुक्ती

सावंतवाडीतील परिक्षीत मांजरेकर यांची शिंदे गट शिवसेना जिल्हा सचिवपदी नियुक्ती

सावंतवाडी :

शिंदे गटाच्या शिवसेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा सचिवपदी सावंतवाडीचे परिक्षीत मांजरेकर यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री तथा पक्षनेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

या वेळी जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सांगितले की, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण जोपासून त्याचा प्रसार व प्रचार करीत पक्षवाढीसाठी कार्य करावे, अशी अपेक्षा मांजरेकर यांच्याकडून आहे.

या प्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, युवासेना विधानसभा प्रमुख अर्चित पोकळे, सचिव उमेश आरोलकर, सत्यवान बांदेकर, प्रथमेश सावंत, विनोद सावंत, प्रशांत साटेलकर, सुजीत कोरगावकर, आबा केसरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा