You are currently viewing नवरात्री आठोळी साहित्यिक उपक्रम : अभूतपूर्व सहभाग आणि रंगीबेरंगी सर्जनशीलता!

नवरात्री आठोळी साहित्यिक उपक्रम : अभूतपूर्व सहभाग आणि रंगीबेरंगी सर्जनशीलता!

 

मनस्पर्शी साहित्य, कला व क्रीडा प्रतिष्ठान (नोंदणी क्र. ९४१/२०२५) आयोजित नवरात्र विशेष आठोळी साहित्यिक उपक्रम हा ११ दिवसांचा सर्जनशील प्रवास अत्यंत यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. या उपक्रमात तब्बल २५० हून अधिक व्हिडिओ सहभागी सदस्यांकडून प्राप्त झाले. प्रत्येक रचनेने नवरात्रीच्या दिवसाला शब्दरुपी रंग, आनंद आणि उत्साहाची अनोखी उधळण केली.

सर्व व्हिडिओ YouTube वर अपलोड करण्यात आले असून, प्रेक्षकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला आहे. दृश्यसंख्या आणि कमेंट्समधून उपक्रमाची लोकप्रियता स्पष्टपणे जाणवली. प्रत्येक रचना नेमकी ८ ओळींची, दिवसाच्या रंगावर आधारित, शुद्धलेखनासहित आणि यमकयुक्त होती. पांढरा, लाल, रॉयल ब्लू, पिवळा, हिरवा, राखाडी, केशरी, मोरपिशी, गुलाबी आणि जांभळा या रंगांवर साकारलेल्या रचनांनी नवरात्रीच्या उत्सवाला अधिकच रंगतदार बनवले.तसेच दसऱ्याच्या दिवशीदेखील हा उपक्रम विस्तारित झाला!

हा उपक्रम फक्त साहित्यिक सर्जनशीलतेपुरता मर्यादित न राहता, तो आनंद, सहभाग आणि एकतेचा उत्सव ठरला. नोंदणीनंतर संस्थेचा हा पहिलाच उपक्रम असून, इतक्या मोठ्या प्रमाणावर मिळालेला प्रतिसाद पाहून प्रशासक मंडळाला विशेष आनंद झाला आहे. सर्व सहभागी सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या प्रतिभेला डिजिटल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

नवरात्रीचे रंग, आनंद, शब्द आणि उत्साह – हे सर्व एका आठोळीच्या माध्यमातून अनुभवायला मिळाले!

उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या संस्थापिका व अध्यक्षा कु. मानसी संतोष मनाली पंडित यांनी स्वतः पुढाकार घेतला. तसेच सचिव राजेश नागुलवार, सहसंचालिका सौ. जयश्री शेळके शिळीमकर आणि कोषाध्यक्ष निखिल प्रमोद कोलते यांनीही महत्त्वाचे योगदान दिले.

या उपक्रमात सहभागी झालेल्या साहित्यिकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

आशा पाटील, अदिती राजवैद्य, अनुराधा अंबिके, अरुणा मुल्हेरकर, दामोदर बेडेकर, दीपक खांडेकर, दिपाली वैद्य, जयश्री डोंबे, मंगल यादव, मंजुषा चिटटवार, मेधा घोंगे, मुग्धा करंदीकर, प्रतिक्षा ठाकरे, प्रिया माळी, रचना रेडकर, रश्मी भिडे, राधिका भांडारकर, रेणुका मार्डीकर, रोहिणी सुरू, ऋचा पत्की, स्मिता तोरस्कर, स्नेहलता काळे, सोनाली जगताप, श्यामल कामत, शामा देशपांडे, विजया भांगे, शोभा वागळे, शितल गांधी, उज्वला सहस्त्रबुद्धे, पूजा ढाके, रसिका शाळीग्राम.

प्रतिक्रिया व्यक्त करा