*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गोदावरी*
माझी माय गोदावरी
वाहे निर्मळ,नितळ
जन्म तिचा ब्रम्हगिरी
वाहे धार खळखळ
रामकुंड तीर्थावरी
पिता दशरथा साठी
पिंड पुजले रामाने
दशक्रिया नदीकाठी
सीताकुंड तो पावन
तीर्थ त्याचे सुमंगल
स्नान नित्य करतात
भक्त जन ती सकल
चौदा वर्षे वनवास
रामरायाने साहीला
दशरथाच्या आज्ञेला
शिरसावंदय मानिला
राजमहाल त्यागुनी
सीता राम लक्ष्मण
कंदमुळे रानातली
करीत असे भक्षण
लक्ष्मण सेवा करी
असे तत्पर कार्यासी
चौदा वर्षे आहार निद्रा
नाही माहीत तयासी
बारा वर्षांनी घडतो
कुंभमेळा तपोवनी
येति पायी ऋषीमुनी
होते पावन धरणी
*शीला पाटील. चांदवड.*

