You are currently viewing फास

फास

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*फास*

*(शेतकऱ्याच्या गळ्यातला)*

 

जगण्याला कंटाळून

रोज मरतात शेतकरी

आणि पुसले जातात

कितीतरी कपाळावरचे कुंकू

पोरका होतो संसार

आनाथ होतात मुलं

भविष्याच्या अंधारात

 

त्यानंतर असंख्य जखमा

मुक वेदना आणि कधी न सुटणाऱ्या

निर्दोष प्रश्नांच ओझं ओढताना

जगायचं असतं फक्त तिलाच

एकटीला विविध होवून

 

एका माणसाच्या मरणाने

कुंकवाच्या भारातून

कपाळ कोरे होते

पण शेती माती तशीच

कर्जाच भार घेऊन पडून राहते

स्वतःला दोष देत

 

किती सोपं वाटतं मरण

म्हणून बांधून घेतो फास गळ्यात

आणि प्रश्न पडतो त्या सुकलेल्या मातीला

इथे कोण चुकलं पाऊस की माणूस

 

मुंडन करून शेतकरी मेल्याचं

सूतक तर फेडल जातं

पण माती तशीच पडून रहाते

सुतकात वर्षानुवर्षे

 

माणूस जगण्यातून मुक्त होतो

पण अमानुष शिक्षा भोगण्याऱ्या

त्या शेती मातीला कुठल्याच कर्जातून

मुक्त होता येत नाही पिढ्यानपिढ्या

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसूमाई)*

९४२२८९२६१८

९५७९११३५४७

प्रतिक्रिया व्यक्त करा