*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कॅमेर्यासोबतच..जगणं माझं..*
आपुलकीची ऐशीतैशी ..कराया
कॅमे-यापासून नवसंजीवनी गवसली
भावबंधनास तिलांजली देण्याची
कला….कॅमेर्यानेच शिकवली
ताण कमी करायला
स्वतःची ओळख लपवतो
कमकुवत कुंपण प्रतिबिंबाची
माझीमीच डिलीट करतो..
मोठ्यामाणसांच्या मनोहर ठेवींनी
कॅमेर्यानेच समृद्ध जगवले
बलदंडातून बुलंद शक्तीला
व्यक्तीमत्वातून जगापुढे आणले
निसटत्या काळाच्या आठवणीतून
गौरवपूर्ण क्षण..चिमटीत पकडले
तारूण्याचा मागोवा काढत
बदलत्या तोंडावळ्यातून फिरवले
आता..एवढा जल्लोष कशासाठी
अभिव्यक्तीच्या छावण्या कशाला
चाल..चलन..चरित्राला…जप
कॅमेर्यासोबतच जगणं स्वाभिमानाला
बाबा ठाकूर
