You are currently viewing मिठबाव येथे नितेश राणे यांच्यासोबत स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव

मिठबाव येथे नितेश राणे यांच्यासोबत स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव

देवगड :

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक प्रसंगी महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी देवगड तालुक्यातील मिठबाव येथे संघाच्या शाखेला भेट देऊन स्वयंसेवकांसोबत विजयादशमीचा उत्सव साजरा केला.

या कार्यक्रमात तालुक्यातील विविध भागांमधून आलेल्या स्वयंसेवकांशी संवाद साधत त्यांनी संघाच्या कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर आयोजित संचलनातही नितेश राणे स्वयंसेवकांसोबत उत्साहाने सहभागी झाले.

संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त झालेल्या या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या प्रसंगी बोलताना राणे म्हणाले की, “संघाचा शिस्तबद्ध कार्यप्रणाली, राष्ट्रभक्ती, सेवाभाव आणि मुल्यांचा वारसा हा केवळ उत्सवापुरता मर्यादित नसून भविष्यातील भारताचा अढळ निर्धार आहे.”

कार्यक्रमादरम्यान झालेल्या सांघिक उपक्रमांमध्ये स्वयंसेवकांसोबत नागरिकांनीही सहभाग नोंदवला. संपूर्ण परिसर ‘जयघोष’ व देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा