वेंगुर्ले :
महात्मा गांधी व भारतरत्न माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त वेंगुर्ले येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात अभिवादन कार्यक्रम पार पडला. ज्येष्ठ कार्यकर्ते दीपक भगत यांच्या हस्ते गांधीजी व शास्त्रीजींच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी मान्यवरांनी दोन्ही थोर नेत्यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, भारताच्या राजकीय क्षितिजावर साधेपणा, सचोटी आणि असामान्य ध्येयनिष्ठा या गुणांनी तळपणारे तेजस्वी व्यक्तिमत्त्व म्हणजे लाल बहादूर शास्त्री होत. त्यांच्या “जय जवान, जय किसान” या घोषणेने राष्ट्राला नवी ऊर्जा मिळाली.
त्याचप्रमाणे महात्मा गांधी हे केवळ एक नाव नसून सत्य, अहिंसा आणि साधेपणा या मुल्यांचा जिवंत वारसा आहेत. २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे जन्मलेले गांधीजी पुढे जगाला शांततेच्या क्रांतीची दिशा देणारे युगपुरुष ठरले.
या कार्यक्रमाला विष्णू उर्फ पप्पू परब, प्रसन्न उर्फ बाळू देसाई, राजन गिरप, सुहास गवंडलकर, सुषमा खानोलकर, राजबा सावंत, सुभाष बोवलेकर, अनिल तेंडोलकर, सत्यवान पालव, संजय मळगावकर, हेमंत गावडे, प्रणव वायंगणकर, ज्ञानेश्वर केळजी, चेतना रजपूत, श्रेया मयेकर, ईशा मोंडकर, मनवेल फर्नांडिस, रसिका मठकर आदी मान्यवर उपस्थित होते.

