You are currently viewing कारिवडे साई सुरभी हॉटेल नजीक अपघात कागल येथील युवक गंभीर सामाजिक बांधिलकीचे मदत कार्य.  

कारिवडे साई सुरभी हॉटेल नजीक अपघात कागल येथील युवक गंभीर सामाजिक बांधिलकीचे मदत कार्य.  

कारिवडे साई सुरभी हॉटेल नजीक अपघात कागल येथील युवक गंभीर सामाजिक बांधिलकीचे मदत कार्य.

सावंतवाडी

कारिवडे साई सुरभी हॉटेल वळणावर आज सकाळी सात वाजता मोटरसायकल व कॅन्टर या दोघांमध्ये अपघात झाला रस्त्याचा अंदाज चुकल्याने कागल कन्नूर येथील ओमकार अंकुश जगताप वय 25 याने कॅन्टरला मागून जोरदार धडक दिली व तो रस्त्याच्या बाहेर फेकला गेला याची तत्काळ माहिती एसटी कर्मचारी बी एल कासार यांनी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांना दिली असता सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठांचे रवी जाधव यांनी तेथील ग्रामस्थ व 108 च्या मदतीने त्या युवकाला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. त्याच्या डोक्याला,हाताला, पायाला व बरगड्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या नातेवाईकांना याची कल्पना दिली परंतु कागल वरून नातेवाईपर्यंत तीन तास होणार होते त्यामुळे नातेवाईकांची वाट न पाहता अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे त्या युवकाला नेण्यासाठी जबाबदारी सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव व लक्ष्मण कदम यांनी स्वीकारली.

प्रतिक्रिया व्यक्त करा