You are currently viewing सिध्दीदात्री माता

सिध्दीदात्री माता

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*सिध्दीदात्री माता*

 

हिमालयात हीचे निवास

अर्ध नारी नटेश्र्वर म्हणती

तिच्या कृपेने कार्य सिध्दीसी

हेचं कार्य असते जगती

 

असुरांच्या अत्याचाराने

सुरांनी दावली तेजप्रभा

दिव्य शक्तीने सिध्द जाहली

सिध्दीदात्री देई मुभा

 

साधना तिची करता

रिद्धी सिद्धी होई प्रसन्न

दुःख सारे दूर पळती

घट स्थापना करती आसन

 

सिद्धी दात्री प्रसन्न होता

दुःख दारिद्रय विनाशते

प्रसन्न होऊन गाऊ आरती

घरदार प्रकाशने खुलते

 

नावं रात्रीच्या नवरात्रीला

देवी महात्म्य ते स्मरावे

सिद्धीदात्री प्रसन्न होते

गुणगान तिचे गावे

 

*शीला पाटील. चांदवड.*

प्रतिक्रिया व्यक्त करा