You are currently viewing ओसरगाव शाळेत सरस्वती पूजनानिमित्त माजी सरपंच बबली राणे यांची शुभेच्छा भेट 

ओसरगाव शाळेत सरस्वती पूजनानिमित्त माजी सरपंच बबली राणे यांची शुभेच्छा भेट

ओसरगाव शाळेत सरस्वती पूजनानिमित्त माजी सरपंच बबली राणे यांची शुभेच्छा भेट

कणकवली

ओसरगाव नं. 1 शाळेत सरस्वती पूजनाच्या निमित्ताने गावाचे माजी सरपंच मा. बबली राणे यांनी शाळेला भेट देऊन सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालक वर्गाला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या भेटीमुळे शाळेतील वातावरण उत्साहवर्धक झाले.

या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जीवबा अपराज, उपाध्यक्ष नयन आलव, मुख्याध्यापक किशोर कदम, शिक्षक शितल दळवी मॅडम, राजश्री तांबे, प्रमिता मॅडम तसेच अनेक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बबली राणे यांचे शाळेसाठीचे योगदान अत्यंत लक्षणीय असून त्यांच्या शुभेच्छांमुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाली.

👉 शाळा ओसरगाव नं. 1 कुटुंबीयांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. 🙏

दरवर्षीप्रमाणे यंदाही ओसरगाव परिसरातील विविध शाळांमध्ये सरस्वती पूजन मोठ्या श्रद्धेने पार पडले. गवळवाडी, ओसरगाव तलाव, ओसरगाव बोर्डवे हायस्कूल, खासकीलवाडी शाळा व कानसळीवाडी शाळा येथे विद्यार्थ्यांनी सरस्वती मातेचे दर्शन घेतले.

कानसळीवाडी शाळेतील लहान मुलांनी सादर केलेल्या सुंदर भजनांनी सर्वांचे मन जिंकले आणि त्यांना पारितोषिकही देण्यात आले.

🎉 हा उत्सव संपूर्ण ओसरगाव परिसरात भक्तिभाव आणि आनंदात पार पडला.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा