*▪️२४ वर्षांची अखंड सेवा पूर्ण करून सावंतवाडीचा सुपुत्र सैन्यातून सेवानिवृत्त*
*शिवप्रसाद रघुनाथ मुळीक यांचा गौरवशाली प्रवास*
सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली गावातील शिवप्रसाद रघुनाथ मुळीक यांनी तब्बल २४ वर्षांची सेवा पूर्ण करून ३० सप्टेंबर २०२५ रोजी भारतीय सैन्यातून सेवानिवृत्ती घेतली. त्यांच्या दीर्घ सेवेमुळे देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत त्यांनी मोलाचा वाटा उचलला आहे.
ऑगस्ट २००१ साली सावंतवाडी पोलीस स्टेशन मैदानावर झालेल्या सैन्य भरती मध्ये सैन्यात भरती झालेल्या मुळीक यांनी एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अरुणाचल प्रदेशात पहिली पोस्टिंग मिळवली. त्यानंतर २००३ ते २००८ भुसावळ, २०१० ते २०१२ पट्टन, २०१० ते २०१२ श्रीनगर, २०१२ ते २०१५ पाटियाला, २०१५ ते २०१८ द्रास, २०१८ ते २०२१ दुरगामुल्ला आणि २०२१ ते २०५ फरीदकोट अशा विविध ठिकाणी कार्य केले. विशेष म्हणजे डिसेंबर २०२० ते एप्रिल २०२१ या कालावधीत त्यांनी गलवान घाटीतही सेवा बजावली. या प्रदीर्घ सेवेनंतर आज दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी सेवा निवृत्त होतं आहेत.
त्यांच्या सेवेमुळे केवळ कुटुंबीयांचाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान वाढला आहे. सेवानिवृत्तीनंतर गावकऱ्यांकडून त्यांचा सत्कार करण्याची तयारी सुरू आहे.
