You are currently viewing महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ तालुका आयोजित सिद्धिविनायक मित्र मंडळ पिंगुळी नवरात्री उत्सव येथे म्युझिकल नाईट गरबा शोला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ तालुका आयोजित सिद्धिविनायक मित्र मंडळ पिंगुळी नवरात्री उत्सव येथे म्युझिकल नाईट गरबा शोला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

*महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ तालुका आयोजित सिद्धिविनायक मित्र मंडळ पिंगुळी नवरात्री उत्सव येथे म्युझिकल नाईट गरबा शोला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.*

*मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांच्या संकल्पनेतून तालुकाध्यक्ष हेमंत जाधव व उप तालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे यांचे उत्कृष्ट नियोजन.*

कुडाळ तालुक्यातील पिंगळी येथे सिद्धिविनायक मित्र मंडळ यांच्यामार्फत नवरात्र उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. सदर नवरात्र उत्सवामध्ये नऊ दिवसांमध्ये एक दिवस गेली 18 वर्षापसून मनसे कुडाळ श्रोत्यांच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करत असते. याही वर्षी मनसे मार्फत या ठिकाणी शुक्रतारा म्युझिकल बँड गरबा शोचे आयोजन करण्यात आले होते. सिद्धीविनायक मित्रमंडळ नवरात्र उत्सव येथे मनसे आयोजित शुक्रतारा म्युझिकल बँड गरबानाईट शोचा शुभारंभ मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले यावेळी विभाग अध्यक्ष प्रथमेश धुरी, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष यतिन माजगावकर, गिरफ जिमचे मालक साईराज जाधव व सिद्धिविनायक मंडळाचे अध्यक्ष तसेच सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. या शुक्रतारा मालवण गरबा नाईट शोला तरूणाई तसेच नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा