30 सप्टेंबरचे रस्ता-खड्डे आंदोलन तूर्तास पुढे- रवी जाधव
सावंतवाडी
30 सप्टेंबर रोजी सावंतवाडी शहरामध्ये रस्त्यावरील खड्डे, बस स्टँड वरील खड्डे तसेच हायवे वरील व भोसले कॉलेज रोड येथील या खड्ड्यांकडे प्रशासनाचा लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याकरिता रस्त्यावरील खड्ड्यात बसून आंदोलन करणार असल्याचे रवी जाधव यांनी जाहीर केले होत. परंतु या आंदोलनाची सावंतवाडी नगरपरिषदेने पत्राद्वारे उशीरा दखल घेऊन पत्राद्वारे कळविण्यात आले की तयार डांबर प्राप्त झाल्यामुळे पावसाचा जोर कमी झाल्यावर लगेच खड्डे बुजवण्यात येथील त्यासाठी आपण सहकार्य करणे तसेच बस स्टैंड वरील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात तात्काळ बुजवण्यात आले होते त्याचप्रमाणे चार तारीख पर्यंत मनाई आदेश असल्यामुळे व पोलिसांच्या विनंतीला मान देऊन तूर्तास आंदोलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तरी अद्यापही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून संस्थेच्या प्रस्तावित खड्डे संदर्भात पत्राची कुठल्याही प्रकारे दखल घेण्यात आली नसून सावंतवाडी बस स्टॅन्ड व नगरपरिषद वगळून यापुढचे आंदोलन पुढे ठरवण्यात येणाऱ्या तारखेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोर केले जाईल याची शालेय संस्था, सामाजिक संस्था व नागरिक याची नोंद घ्यावी असे रवी जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकातून सांगितले आहे. पुढील आंदोलनाची तारीख लवकरच सर्व सामाजिक संस्था व नागरिकांच्या विचार विनिमयाने ठरविण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.
